महिन्याभारत जि.प.त कार्यान्विन होणार एसबीआय सीएमपी प्रणाली

0

सर्व अनुदान, देयके याप्रणालीमार्फतच वर्ग होणार

जळगाव: जिल्हा परिषदेमार्फत विविध विभागाच्या योजनांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीचे वाटप धनादेशाद्वारे अदा केले जात होते. परंतु पारदर्शकता तसेच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता विविध विभागाच्या योजनांवर खर्च करण्यात आलेल्या रकमा आणि अनुदान स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे. ही प्रणाली महिन्याभरात जिल्हा परिषदेत कार्यान्वीत केली जाणार असल्याची माहिती जि.प.चे मुख्य लेखा अधिकारी विनोद गायकवाड यांनी दिली.

आर्थिक व्यवहारांच्या नोंदीचा आढावा घेणे सोपे

या प्रणालीमुळे धनादेश चोरीला जाणे, गहाळ होणे, चुकीच्या खात्यावर रकमा वर्ग होणे या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयात ही प्रणाली सुरु आहे. यासह शिक्षण विभागाच्या शालार्थ टीमने ही शिक्षकांच्या वेतनाची सीएमपी प्रक्रिया यशस्वी करून दाखवली आहे. त्याद्वारे दरमहा ८ हजारांपेक्षा अधिक शिक्षक, मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये वेतन रक्कम व कपाती अचूक वर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी वेतनास होणारा विलंब व आर्थिक भुर्दंडापासून शिक्षकांचा बचाव झाला आहे. त्याच धर्तीवर आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आर्थिक अनुदान अॉनलाइन एसबीअाय सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे.