महिंदळे येथे नागरिकांची पाण्यासाठी होतेय भटकंती

0

धुळे । तालुक्यातील महिंदळे येथील राजदीप सोसायटी व स्था परिसरातील कॉलनी रहिवाशांना ग्राम पंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा पाणी पुरवठा करण्यात येत नसल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या कॉलण्यांसाठी स्वतंत्र पाईपलाईन व पाण्याची सुविधा व्हावी म्हणून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. राजदीप सोसायटी व परिसरातील कॉलन्या उंचावर येत असल्यामुळे स्वतंत्र पाणी पुरवठा व पाण्याची टाकी किंवा बोअरवेल करण्यात यावा. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतांना अरुणा खरात, सुशिला साळुंखे, प्रमिला पाचमोई, मंदा ठाकरे, वैशाली देसले, लताबाई चव्हाण, प्रमिला साळुंखे, लक्ष्मण शिंदे, धनंजय वाघमोडे, सचिन चव्हाण, विकास चव्हाण, भुषण आडमांळे, भालचंद्र जाधव व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 20 ते 25 वर्षापासून रहिवासी आहे. तरी देखील अजुनपर्यंत मुलभुत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही.