महा ई सेवा केंद्रात होतेय नागरिकांची लूट

0

धुळे । शहरातील महाईसेवा केंद्रात होणारी लुट थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धुळे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.

जिल्हायातील ई-सेवा केंद्राना शासनाने ठरवून दिलेला दर पत्रकाप्रमाणे दर आकारण्याचे आदेश देवून सदरचे दर पत्रक ई-सेवा केंद्रांच्या दर्शनी भागात आहेत परंतू ई-सेवा केंद्र चालक आपली मनमानी करत नागरिकांकडून अवाजावी रक्कम वसुल करत आहेत. तरी अशा ई-सेवा केंद्रावरती कारवाई करण्यात यावी अशी भाजपा युवा मोर्चाचे कुणाल चौधरी, सागर कोडगीर, अभित भोसले, नितीन शिंदे, अमृता पाटील, स्वप्निल लोकरे, अकाश अग्रवाल, सचिन जाधव, प्रियंका रेलन, अभय सोनार यावेळी आदीसह उपस्थित होते.