महावीर जयंती अहिंसा दिवस घोषित करण्याची गरज

0

मुंबई । भगवान महावीरांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून घोषित होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल श्री.चे.विद्यासागर राव यांनी आज येथे केले. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भारत जैन महामंडळ यांच्या वतीने मुंबई येथील पाटकर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आचार्य पदमानंदजी महाराज, मुनी महेंद्र कुमारजी, आमदारद्वय, राज पुरोहित, राजेंद्र पटणी, रिजर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष के.सी.जैन, तरुण जैन, पृथ्वीराज कोठारी, के.सी.सेठी, प्रमोद कटारिया, सर्व जैन समाज बांधव उपस्थित होते.

त्यांच्या कार्याला दिला उजाळा
आजच्या दिवशी भगवान महावीरांनी जगाला दिलेल्या अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह या पाच तत्वांची जाणीव होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश म्हणजे फक्त सजिवांना न मारणे इतक्यापुरता मर्यादित नसून अहिंसा ही विचारातून, शब्दातून प्रकट होते.

’शांततामय‘साठीही प्रसिद्ध
भारतास ‘समर्थ भारत’ बनविण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण तरुणांना देण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. जैन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक आहेत. त्याचप्रमाणे शांततामय आचरणासाठीसुध्दा ते जगभर प्रसिध्द आहेत.