महावितरणच्या कर्मचार्‍यास शिवीगाळ करीत मारहाण : पातोंडा गावातील घटना

Mahavitaran Employee Assaulted Due to Power Outage in Patonda : Crime Against Three चाळीसगाव : वीज गेल्याच्या कारणावरून तिघांनी शासकीय कर्तव्यावर असलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्काबुक्की करीत केली शिविगाळ
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रदीप सुरेश आमले व काही सहकारी पातोंडा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभे राहुन थकबाकीची यादी तपासत असताना असताना संशयीत आरोपी ज्ञानेश्वर भिला चौधरी याने लाईनमन राकेश सूर्यवंशी (38) यांना लाईट गेल्याच्या कारणावरुन जाब विचारत उजव्या कानावर हाताने तसेच चापटांनी मारहाण केली तसेच धक्काबुक्की करीत शिविगाळ केली. याप्रकरणी संशयीत आरोपी ज्ञानेश्वर भिला चौधरी, दीपक लक्ष्मण पाटील, एकनाथ निंबा पाटील यांच्यासह इतर 8 ते 10 अनोळखी लोकांविरुद्ध राकेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.