महाविकास आघाडी विरोधातील ‘ही’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली !

0

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसल्यामुळे विश्वासदर्शक ठरवपुर्वीच राजीनामा दिला. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. उद्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. महाविकास आघाडीही नैतिकदृष्ट्या योग्य नसून ही आघाडी रद्द करण्यात येऊन महाराष्ट्रात नव्याने निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

शनिवारी २३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी विरोधात जाऊन हे पाऊल उचलल्याने शरद पवार यांनी बहुमत मिळविण्याचा मनसुबा हाणून पडला. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. यावर सुप्रीम कोर्टाने तातडीने आज बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.