महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत तुफान राडा

0

सोलापूर: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक सुरु आहे. १ डिसेंबरला मतदान होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. पुणे विभागासाठी सोलापूर येथे महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो प्रचाराच्या बॅनेरवर नसल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रचारासाठी आलेले कोल्हापूरचे पालकमंत्री कॉंग्रेस नेते राज्यमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना समज देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हेतुपुरस्सर कॉंग्रेस नेत्यांचा अवमान सुरु केला आहे. जाणीवपूर्वक सुशीलकुमार शिंदेंचा फोटो लावण्यात आलेला नाही असा आरोप कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Copy