महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे द्वारसभा

0

जळगाव । महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे पगार वाढीसाठी 6 फेब्रुवारी 1967 रोजी संप पुकाराला होता. या घटनेस 6 फेब्रुवारी 2017 रोजी 50 वर्ष पूर्ण होत असल्याने फेडरेशनद्वारा राज्यभरात द्वारसभा, बैठका घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली विज कामगार,अभिंयते व अधिकारी यांची पगारवाढ निश्चित करण्यासाठी कालेलकर लवाद राज्य सरकारने नेमला होता . मात्र कालेलकर लवादाने पगार वाढ जाहिर करताना बेसिक मध्ये रु.5 व महागाई भता वाढ रु.7 असे रु.12 जाहिर केली. त्यामुळे हंगामी वाढ म्हणून मिळालेले पैसै कापण्यास विघुत मडंळ प्रशासनाने सुरुवात केली.

सोमवारी फेडरेशनद्वारे द्वारसभा, बैठक
असतोंषात रुपांतर होवुन 1 जानेवारी 1967 साली सर्व कामगार, अभिंयते व अधिकारी एक दिवसाच्या सामुदायिक रजा आदोंलन केले होेते. विघुत मडंळात कार्यरत कामगार सघंटना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य विज कामगार महासंघ व इटंक या सघंटनानी एकत्र एवुन 6 फेब्रुवारी 1967 पासुन बेमुदत सपांची नोटीस दिली.

43 दिवस चालला होता संप
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली सपं सुरु झाला होता. हा संपात 90% कामगार, अभिंयते व अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. हा संप 43 दिवस चालला. या घटनेला 6 फेब्रुवारी 2017 रोजी संपाला 50 वर्ष पुर्ण होत आहे म्हणून महाराष्ट्रात फेडरेशन त्याच दिवशी व्दारसभा, बैठका, मेळावे घेवुन नविन कामगारांना सहभागाचे आव्हान सघंटनेचे अध्यक्ष काँ.मोहन शर्मा, कार्याध्यक्ष काँ.सि.एन.देशमुख,सरचिटणिस काँ.कृष्णा भोयर व अतिरिक्त सरचिटणिस काँ.महेश जोतराव सर्व उपाध्यक्ष, उपसरचिटणिस तथा संयुक्त सचिव व राज्य खजिनदार तसेच ऑ.क.चेअरमन कॉ जे एन बाविस्कर,जे.वि.का. नेते कॉ पी एम अडकमोल,झोनल सचिव कॉ देवरे आबा,सर्कल सचिव कॉ विरेंद्र पाटील यांनी केलेले आहे.