महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने दाखल झाले पोलीस 669 अधिकारी

0
43 उपनिरीक्षकांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात नियुक्ती
13 अधिकार्‍यांची पुणे आयुक्तालयात नेमणूक
पिंपरी : पुणे पोलीस आयुक्तालय हे जिल्ह्यातील एकमेव पोलिस आयुक्तालय होते. पिंपरी-चिंचवड, हडपसर, कोथरूड आदी शहराच्या उपनगर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला. नागरिकांची संख्या वाढली, इमारती वाढल्या, रोजगार वाढले, नोकरी-धंद्यांमध्येही वाढ झाली. त्यामुळे परिणामतः गुन्हेगारीपण तेवढीच वाढली. सामान्य नागरिकांना कोणत्याही कामासाठी जायचे तर पुणे आयुक्तालयात जावे लागत होते. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातही अनेक गुन्ह्यांची वाढ झाली होती. त्यामुळे सामाजिक संस्था, नेते आदींनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणीचा सतत पाठपुरावा केल्याने नुकतेच हे स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाले असून मनुष्यबळाअभावी कार्यरत झालेले नाही. त्यामुळे नव्याने पोलीस दलात भरती करण्यात आलेल्या पोलिसांची येथे नियुक्त करण्यात आली आहे. या नव्या आयुक्तालयाचे पहिले आयुक्त असलेले आर.के.पद्नाभम यांनी नुकतीच अनेक पोलीसांची नियुक्ती केली आहे. कालच 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती झाल्यावर महाराष्ट्र पोलीस दलात नुकतेच 669 पोलीस उपनिरीक्षक दाखल झाले आहेत. त्यातील 43 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तर 13 पोलीस उपनिरीक्षकांना पुणे पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आले आहे.
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक
गोविंद चव्हाण, किरण कणसे, संदीप गांधीलकर, महेंद्र गांधले, गणेश गायकवाड, अमरदीप पुजारी, गणेश आटवे, मैनीनाथ वरुडे, अनिरुद्ध सरवदे, अशोक तरंगे, चंद्रकांत जवळगी, शंभू रनावरे, राजेश मोरे, रविंद्र मुंडल, रुपेश साबळे, यशवंत साळुंखे, मकसूद मणेर, इम्रान मुल्ला, प्रितेश पाटील, सचिन देशमुख, संतोष डोलारे, अशोक जगताप, सागर बामणे, अमोल डेरे, रोहीत दिवटे, सोमनाथ झेंडे, अमोल कामठे, अशोक कोकाटे, नामदेव अंगज, संदेश इंगळे, ज्ञानेश्‍वर धनगर, जितेंद्र गिरनार, विवेक कुमठकर, गोविंद पवार, सचिन चव्हाण, संतोष येदे, ज्ञानेश्‍वर दळवी, संतोष गांधले, भाऊ दुबे, दस्तगीर तांबोळी, दत्तात्रय नागरगोजे, ज्ञानेश्‍वर कोकाटे, उत्तम ओमासे असे नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस उपनिरिक्षकांची नावे आहेत.
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक
शशिकांत नामदेव सावंत, चंद्रकांत हनुमंत कामठे, श्रीकांत कृष्णात गुरव, हणुमंत भागवत भोसले, दिलीप भाऊसाहेब खेडकर, अशोक रामकिशन गोंधळे, अनिल नवनाथ बिनावडे, सोपान अगतराव नराळे, रुपेश चंद्रकांत चालके, अतुल दत्तात्रय थोरात, प्रमोद काळुराम हंबीर, राहुल गणपत खंडाळे, मोहनदास आप्पासाहेब जाधव हे सारे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले पोलीस अधिकारी आहेत. हे सारे पोलीस भरतीनंतर दाखल होत आहेत. नव्याने पोलीस म्हणून काम करताना या पोलिसांना विविध आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व पोलीस आयुक्त पद्नाभम यांनी शुभेच्छा देऊन उत्तम काम करण्याच्या सूचना दिल्या. काम करताना वरिष्ठांचा आदर कसा राखावा हेही त्यांनी सांगितले.
Copy