महाराष्ट्र द्वेष्ट्यांकडून राज्याची बदनामी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

0

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुवस्था बिघडलेले आहे. राज्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट सुरु आहे, जणू काय राज्यात अमली पदार्थांची शेतीच केली जाते असे चित्र निर्माण करून महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम केल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केला. त्यानंतर भाजपकडून देखील राज्यातील कायदा सुवस्था बिघडल्याचे सातत्याने आरोप केले आहे. यावर मुख्यमंत्र्यानी भाष्य केले.

रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक झाल्याने भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यात आणीबाणी लागू करण्यात आल्याचे आरोप भाजपने केले, यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. “तुमच्यावर आणीबाणी लागू केली नाहीये” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

Copy