महाराष्ट्रामुळे केेंद्र सरकारला टेन्शन

0

मुंबई – भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल ६० हजारांवर गेला आहे. तर १८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी २० हजारांवर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना रुग्णांची ही संख्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या ३३ टक्के आहे.

देशातील १५ जिल्ह्यांमध्ये ६४ टक्के प्रकरणे आहेत. यातील दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील जिल्ह्यांमध्ये ५० टक्के कोरोना प्रकरणे आहेत. सध्या या ५ शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ११६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार २२८ इतका झाला आहे. दिवसभरात ३३० रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत तब्बल ३८०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १२,८६४ वर गेली असून ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे.