महाराष्ट्रात ‘तानाजी’ करमुक्त करा; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना पत्र !

0

मुंबई: मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ हा महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तानाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी केली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच, त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ आता हरियाना सरकारने देखील तानाजी कर मुक्त केले आहे. महाराष्ट्रात देखील तो करमुक्त व्हावा अशी मागणी होत आहे.

देशातील इतर राजांनी हा चित्रपट करमुक्तीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. अजय देवगणचा तानाजी आणि दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने 2020 मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर, आता हरियाणातील भाजपा सरकारनेही तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Copy