महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ: आज एकाच दिवसात 552 पॉझिटिव्ह

0

नवी मुंबई: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा भारतातही मोठा प्रादुर्भाव        वाढला आहे.        भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांचा संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज रविवारी एकाच दिवसात तब्बल 552 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांचा आकडा आता 4200वर पोहोचला आहे. आतापर्यंत 223 जणांचा मृत्यू झाला असून 507 जण बरे होऊन घरी गेले आहेत. कालही महाराष्ट्रात 350 च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळले होते. दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे समाधानकारक चित्र होते, मात्र आता पुन्हा कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Copy