महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी !

0

मुंबई: जगात कोरनाने थैमान घातले आहे. अक्षरश: हाहाकार माजला आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. कोरोनाची संख्या महाराष्ट्रात शंभरीच्या घरात पोहोचली आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. आज मंगळवारी मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. चारही बळी मुंबईतच गेले आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे. मुंबईतील कोरोनाची संख्या ४० च्या जवळ गेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कंपन्या, कारखाने बंद करण्यात आले आहे.

Copy