महाराष्ट्रात ‘अरूणाचल पॅटर्न’चा डाव उधळला

0

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्येही अरुणाचल प्रदेश प्रमाणेच आमदार मोठ्या संख्येने फ़ोडून पुर्ण बहुमताचे भाजपाचे सरकार आणण्याचे डावपेच सुरू होते. पण फुटणार्‍यांपैकीच एका आमदाराने हे छुपे कारस्थान सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानी घातल्याने अमित शहांचा डाव उधळला गेल्याचे कळते.

मुख्यमंत्री होते अंधारात

गेल्या वर्षी कॉग्रेसचे 20हून अधिक आमदार फोडून त्यांना भाजपात आणायचा डाव शिजला होता. पण ़फुटीरांच्या म्होरक्याने गृहखात्यासाठी हट्ट धरल्याने तो डाव बारगळला होता. त्यात पुढाकार घेणार्‍या भाजपा नेत्यालाही घरी बसावे लागले होते. त्यानंतर आता सेनेचे तितकेच आमदार फ़ोडण्याचे कारस्थान शिजत होते. मात्र त्याविषयी मुख्यमंत्री पुर्णपणे अंधारात होते. म्हणूनच तो डाव उलटला आहे. ़मुख्यमंत्री फडणवीसांना अंधारात ठेवून दिल्लीहून ही सुत्रे हलवली जात होती. पण ़फुटण्याच्या यादीत असलेल्या एका आमदाराने जाणता अजाणता त्याची माहिती पक्षप्रमुखांना दिली. तर उद्धव ठाकरे यांनी त्यालाच मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा डाव घालण्याची कामगिरी सोपवली. तेव्हा फडणविसांनी हात झटकले आणि तसे पक्षप्रमुखांनाही स्पष्टपणे सांगून टाकले. हे नाटक असेच चालू णार असेल तर अधिकृतरित्या युतीतून बाहेर पडावे लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ह्या घडामोडी थेट पंतप्रधानांच्या कानी घातल्या आणि डाव तिथेच उधळला गेला. नोटाबंदी व अन्य राजकारण उफ़ाळले असताना नव्याने उत्तराखंड वा अरुणाचलचे घोंगडे गळ्यात नको, अशी तंबी मोदींनीच भरल्यावर दिल्लीतले शहाणक्य गडबडले. परिणामी हा विषय तिथेच गुंडाळला गेला. मात्र बाहेर काही माहिती येऊ शकली नाही.

युतीत ‘काड्या’ सुरूच

गेल्या दोन वर्षात कोल्हापूरचे जावई असलेल्या अमित शहांनी चंद्रकांत दादा पाटिल यांना राज्यातल्या दुसर्‍या क्रमांकाचा मंत्री अशा पातळीवर आणून ठेवलेले असल्याने देवेंद्र फ़डणविस यांचा पक्षातील खरा आव्हानकर्ता कोण आहे, ते लपून राहिलेले नाही. शहा आणि फ़डणवीस यांचे पटत नाही आणि ठराविक इतरांकडून सतत युतीमध्ये काड्या घातल्या जात असतात. मराठा मोर्चाचा आडोसा घेऊन फडणवीसांच्या जागी मराठा मुख्यमंत्री आणण्याचे डावपेचही यात गुंतलेले होते. त्यातून हे आमदार फोडाफोडीचे कारस्थान अधूनमधून डोके वर काढत असते.