महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !

0

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, लॉकडाउनची गरज पडू देऊ नका असे आवाहन वजा इशारा दिला होता. रुग्ण संख्या सातत्याने वाढत राहिल्यास लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात आज बुधवारी एकाच दिवशी सर्वाधिक १९९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. बुलढाणा संचारबंदी जारी करण्यात आहे. तर लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्यात आलेली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासूनच कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर बुधवारी एकाच दिवशी १९९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाने शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली असून शिवजयंतीच्या मिरवणुकाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लग्न समारंभाला ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्य॔त एकूण १५,२२५ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून १७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Copy