BREAKING: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे

0

मुंबई: महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रात बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस अधिकारी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत. पोलीस महासंचालकपदासाठी पोलीस अधिकारी संजय पांडे, बिपीन बिहारी यांची नावे चर्चेत होती. मात्र हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रात पदोन्नती झाली आहे. त्यामुळे ही जागा रिक्त होती.

Copy