महामार्ग चौपदरीकरणाचे काम एप्रिलमध्ये सुरु होणार

0

जळगाव ।महामार्ग चौपदरीकरणातील चिखली ते तरसोद या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात एप्रिलमध्ये सुरुवात होणार आहे. मुबईत खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत कामाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) चे अधिकारी, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चिखली ते तरसोद या 62.7 किलोमिटर व तरसोद ते फागणे या 87.3 किलोमिटरच्या
कामाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. दोन्ही कामांसाठी दोन स्वतंत्र एजन्सीचे निविदा मंजूर आहे. महिन्याभरात या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. यातील चिखली ते तरसोद या टप्प्याचे काम विश्‍वराज इन्स्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. बैठकीत चौपदरीकरणासह या टप्प्यातील शहरे व विविध गावांना लागणारे रोड त्यातील काही तांत्रिक बदल , कोणत्या ठिकाणी कसे रस्ते अपेक्षीत आहे. याबबत सूचना केल्या. प्रत्यक्ष काम सुरु करण्यापूर्वी मक्तेदार एजन्सीचे अधिकारी नव्याने या टप्प्याची पाहणी करतील आणि कामाच्या टप्प्यात आणखी कोणत्या बाबी आवश्यक असतील त्यांचा कामात समावेश केला जाणार आहे.

फेकरीचा टोल बंद करण्याची मागणी
चौपदीकरणाचे काम सुरु होत असल्याने सध्या भुसावळच्या पुढे फेकरी उड्डाणपुलावर घेतला जाणारा टोल बंद करावा, अशा मागणीचे पत्र केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे. चौपदरीकरणाच्या कामाला पुढीत महिन्यात सुरुवात होईल. काम चांगल्या दर्जाचे व सुविधांनी परिपूर्ण होण्याबाबत या संपूर्ण कामावर लक्ष ठेवले जाणार आहे. काम सुरु करण्याच्या दृष्टीने कंपनीची यंत्रणा महिन्याभरात प्रत्यक्ष कामाच्या जागेवर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कामाचे स्वरुप मोठे असल्याने या टप्प्यात दोन-चार ठिकाणी कंपन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी जागेची उपलब्धताही करुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबत परवानगी दिली असून आता प्रत्यक्ष काम सुरु होण्याचीच प्रतिक्षा आहे.