महामार्गावरील पुलाचे साहित्य लांबवणारे चोरटे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नागेश्वर मंदिरासमोर सुरू असलेल्या पुलाचे लोखंडी पाईव अँगल लांबवण्यात आल्याची घटना 8 रोजी उघडकीस आली होती. दुर्गा सेक्युरटचे सुपरवाईजर निलेश कडु वानखेडे (40 रा.हनुमान नगर) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात तक्रार केल्यानंतर दोघा चोरट्यांना नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तेजस गोपाळ अत्तरदे (30, रा.लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ) व रुपेश बेंजामीन पातोळे व (29, रा.दत्त नगर, वांजोळा रोड, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेले सहा हजारांचे पाईप व अँगल जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, कॉन्स्टेबल दिनेश कापडणे, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, वाल्मीक सोनवणे आदींनी केली. तपास नाईक रवींद्र बिर्‍हाडे करीत आहेत.

Copy