Private Advt

महाबळ परीसरातून महिलेची दुचाकी चोरीला

जळगाव : महाबळ परीसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहासमोरून महिलेची 20 हजार रुपये किंमतीची चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काही क्षणात लांबवली दुचाकी
सरीता अजय खाचणे (53, रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी) या एका वृत्तपत्रात एक्झीकेटीव्ह आहेत. सोमवार, 7 मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सरीता खाचणे यांनी दुचाकी (एम.एच. 19 बी.व्ही.4447) ने महाबळ परीसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाबाहेर लावली मात्र काही वेळेत चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी सोमवार, 14 मार्च रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.