महापौर जाधव यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0
तळवडेतील शाळांची केली पाहणी 
तळवडे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोनवणे वस्ती, तळवडे, म्हेत्रेवस्ती येथील प्राथमिक शाळांची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली. शाळेतील समस्या जाणून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. महापौर जाधव यांच्यासोबत शिक्षण समितीच्या सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, नगरसेविका साधना मळेकर, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सोनल म्हेत्रे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी पराग मुंडे उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा शुक्रवार (दि.21)पासून सुरु केला आहे. महापालिकेच्या सर्व शाळांची महापौर पाहणी करुन समस्या जाणून घेणार आहेत. शुक्रवारी सोनवणे वस्ती, तळवडे, म्हेत्रेवस्ती येथील प्राथमिक शाळांची पाहणी केली. शाळेमध्ये वर्ग खोल्या वाढविणे, पुरेशा शिक्षकांच्या नेमणुका करणे, पूर्ण वेळ मुख्याध्यापकांची नेमणूक करणे, स्वच्छता राखणे, विद्यार्थ्यांची पट संख्या वाढविणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.