महापौरांनी केले महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन

 

   जनशक्ती न्युज  | महापालिका प्रतिनिधी | – महिला व दलितांच्या सर्वांगीण विकासासाठी जिवन समर्पित करणारे , देशाला सत्यशोधक विचारांचा वारसा देणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथी निमित्ताने जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन केले. यावेळी फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला व फुले नगर येथील महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यांची होती उपस्थिती

मुकुंद सपकाळे , अमोल कोल्हे , हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे , वाल्मिक सपकाळे , महात्मा फुले समता परिषदेचे निवेदिता ताठे , संतोष भाऊ , शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पाटील, कार्याध्यक्ष अजय पाटील, पंकज गरुड, किशोर पाटील, पद्माकर चौधरी,अजित चौधरी, मानव भालेराव.

Copy