महापौरांच्या वार्डातील समस्यांची उपमहापौरांकडून पाहणी

0

जळगाव:गुरुवारी महापौर यांचा वार्ड असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपमहापौर सुनिल खडके यांनी दौरा केला. रस्त्यावरील खड्डे, जलवाहिनीतून होणारी गळती, रस्त्यात पडलेले बांधकामाचे वेस्ट मटेरीयल, डासांचा उपद्रव आदी समस्या यावेळी आढळून आल्या. स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, कैलास सोनवणे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, मिनाक्षी पाटील, गायत्री राणे, दिपमाला काळे, नगरसेवक मुकूंदा सोनवणे, चेतना चौधरी,शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, नगररचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, शाखा अभियंता मंजूर खान, मनिष अमृतकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक शरद बडगुजर, स्वच्छता निरिक्षक धिरज गोडाले, अमृत योजनेवरील मक्तेदाराचे अधिकारी प्रदीप पांढरे, गिरिश मोघे, नरेंद्र पाटील,उपस्थित होते.

प्रभाग 4 मध्ये समस्याच समस्या
ममुराबाद रोड पुलाखालील नाल्यात गाळ तुंबलेला आहे. त्यामूळे दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याचा धोका आहे. चंदवाडी, मायक्कादेवी परीसर येथे अमृत योजना अद्याप पोहोचलेली नाही. शनिमंदीरा जवळील ममुराबाद रस्त्यावर काही दिवसांपासून जलवाहिनीतून गळती होऊन रस्त्यावर पाणी साचलेले आहे. तरी वर्दळीचा रस्ता असल्याने दुरुस्तीचे काम कमी वेळात उरकवुन घेण्यासाठी व्हायब्रेटर उपकरण उपलब्ध् करुन मिळण्याची आवश्यकता असल्याचे पाणी पुरवठा अभियंता यांनी सांगितले. मायक्का देवी रिक्षा स्टॉप लगत रस्त्यात बांधकामाचे वेस्ट मटेरियल पडलेले आहे. ते लगेच उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जुना आसोदा रोडवर अमत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्रा ही वाहीणी टाकायची त्याच जागेवर जूनी जलवाहिनी असल्याने खोदकाम करतांना पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडले ही जूनी पाइपलाइन तेथून हलविणे आवश्यक आहे. लिधुरवाडा पुला जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात साफसफाई होत नाही. अतिशय घान झालेली असल्याची तक्रार रहीवाश्यांनी केली. मात्र शौचालयाचे ठिकाणी साद्या पाण्याची व्यवस्था नाही बोअरवेल वरील पंप नादुरुस्त आहे त्यामुळे स्व्च्छता करण्यात अडचणी येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सर्व समस्यांबाबत त्वरीत कार्यवाही करुन तक्रारीचा निपटारा करण्याच्या सुचना उपमहापौरांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत.

Copy