शिवसेनेची गांधीगिरी; महापालिकेसमोर विकला भाजीपाला !

0

जळगाव: शहरात अनेक ठिकाणी भर रस्त्यावर भाजीपाला विक्रेते दुकान लावून भाजीपाला विकतात. त्यानंतर त्याच जागेवर उरलेला खराब भाजीपाला फेकून देत असल्याचे प्रकार दिसून येते. यासंदर्भात महानगरपालिकेने कुठलीही कारवाई न करता साफ दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेतर्फे मनपासमोर ‘भाजीपाला विक्री आंदोलन’ करण्यात आले. स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना अशा प्रकारे अस्वच्छता पसरविले जाते. मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. आंदोलनात शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक बंटी जोशी, शरद तायडे, गणेश सोनवणे, सरिता माळी, शोभा चौधरी आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Copy