महापालिकेसमोर मेट्रो स्थानकाचे काम सुरू

0

पुणे : महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीसमोरील मेट्रो स्थानकाचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि पीएमपीएमएलने परवानगी दिल्याची माहिती महामेट्रोने दिली. महापालिकेसमोर होणारे हे स्थानक जमिनीपासून वर 14 मीटरवर हे स्थानक असणार असून सुमारे 140 मीटर लांबीचे हे स्थानक असणार आहे. यासाठी या ठिकाणचे पाच बसथांबेही हलविण्यात येणार आहे. या स्थानकाच्या परिसरात पार्किंगसाठी मुबलक जागा, आवश्यक माहितीसाठी स्थानकावर मोठे स्क्रीन, वाय-फाय, कॅफेटेरिया या सुविधांसाठी महिला आणि अंध व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महामेट्रोचे वनाज ते धान्य गोदाम या मार्गाचे काम वेगात सुरू असून आयडीएल कॉलनी, वनाज तसेच आनंदनगर स्थानकाचे काम या पूर्वीच सुरू करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता महापालिका भवनासमोरील काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत या ठिकाणी दहा खांब येणार आहेत. येथील वाहतुकीचाही अभ्यास महामेट्रोने केला असून त्यानुसार काम सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतूक टप्प्या-टप्प्याने वळविण्यात येणार आहे. याशिवाय, या ठिकाणी महावितरणसह इतरही सेवावाहिन्या आहेत. त्या हटविण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.

Copy