महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या कार्यालयात चोरी: संगणक, प्रिन्टरसह 69 हजारांचा ऐवज लांबविला

0

जळगाव– शहरातील ढाकेवाडी परिसरात असलेल्या सौ. निर्मलाबाई शिवचंद्र लाठी या महापालिकेच्या शाळेत असलेल्या महापालिकेच्या घरपट्टी वसुलीच्या कार्यालयात चोरट्यांनी चोरी करुन 3 संगणक, 2 इर्न्व्हटर बॅटर्‍या, एक इर्न्व्हटर व एक इंटनेटरचे राऊटर असा एकूण 69 हजारांचा एैवज लांबविला आहे.

6 जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम आटोपून सायंकाळी 7 वाजता कार्यालय बंद करण्यात आले. शिपाई संजय ठाकूर यांनी कार्यालयाला तसेच शाळेच्या मैदानातील गेटला कुलूप लावले होते. व चाव्या महापालिकेच्या 17 मजली येथे जमा केल्या. दुसर्‍या दिवशी 7 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता नियमितपणे महेंद्र कोठावदे, शेखर गोजोरेकर, संजय सपकाळे, छबीलदास इंगळे, राजेश बुतडा, हिरालाल सोनवणे, बालाजी ओडंबे, युवराज सपकाळे असे कर्मचारी कार्यालयात आले. त्यावेळी मुख्य गेटचे कुलूप तोडलेले होते. तसेच कार्यालयाचे कडीकोयंडा तुटलेला दिसला. कार्यालयात सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरीची खात्री झाल्यावर तपासणी केली असता कार्यालयातील 44 हजार रुपये किमतीचे 3 संगणक, 10 हजार रुपये किमतीचे 2 प्रिन्टर, 7 हजार रुपये किमतीचे 2 बॅटरी, 5 हजार रुपये किमतीचे 1 इर्न्व्हटर, 3 हजार रुपये किमतीचे 1 इंटरनेटचे राऊटर असा एकूण 69 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविलेला दिसून आला. याप्रकरणी शिपाई महेंद्र कोठावदे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेंड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहेत.

Copy