महापालिका निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज

0

नागपूर – आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेची संपूर्ण तयारी झाली आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून मतदानावेळी कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक नजर ठेवण्यात येणार आहे. पारदर्शी पद्धतीने निवडणूक व्हावी, निवडणुकीत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी देखील झोननिहाय भरारी पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. कुठेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व घटनांचे चित्रिकरण केले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदान केंद्रावर उमेदवाराने निवडणूक विभागाला सादर केलेला संपत्ती, शिक्षण तसेच गुन्हेगारी वृत्तीबाबत माहिती दिली आहे. त्याचा गोषवारा मतदान केंद्रावर लावण्यात येणार आहे.

मतदानाची टक्केवारी कमी असल्याचा दावा
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर महापालिका त्याचा अवलंब करणार आहे. वर्ष 2012 च्या पालिका निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग रचनेत 19 लाख 86 हजार 57 मतदार होते. त्यावेळी मतदानाची टक्केवारी अल्प राहिली होती. त्यावेळी 52 ते 53 टक्के मतदान झाले होते. आगामी निवडणुकीमध्ये यात 1 लक्ष 3 हजार मतदारांची भर पडली असून पालिकेच्या 151 नगरसेवकांसाठी 20 लक्ष 93 हजार 392 मतदार मतदान करतील. यावेळी मतदानाच्या टक्केवारी मध्ये निश्चित वाढ होईल, असे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.