महापरिनिर्वाणदिनी महामानवास अभिवादन

0

भुसावळ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरासह परिसरातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्था, संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून महामानवास अभिवादन करण्यात आले.

भोळे महाविद्यालय
दे.ना. भोळे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. फालक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आर.एस. सरोदे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रम संपन्नतेविषयी विचार व्यक्त केले. डॉ. संजय बाविस्कर यांनी बुध्दवंदना घेतली. प्राचार्य डॉ. आर.पी. फालक यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करीत संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाही आणि राजसत्ता जागतिक स्तराच्या मानाने प्रशंसनिय असल्याचा निर्वाळा दिला. यशस्वीतेसाठी प्रा. संगिता धर्माधिकारी, डॉ. संजय बाविस्कर, डॉ. संजय चौधरी, डॉ. कांता भाला, प्रा. अंजली पाटील, भारती बेंडाळे, डॉ. जी.पी. वाघुळदे, डॉ. जे.बी. चव्हाण, प्रा. अनिल नेमाडे, प्रा. आर.डी. भोळे आदींनी परिश्रम घेतले.

शहर काँग्रेस कमिटी
शहर काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष रविंद्र निकम व योगेंद्रसिंग पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय तुरकुले, इस्माईल गवळी, संजय खडसे, तसलीम खान, भगवान मेढे, विजय नरवाडे, प्रमोद पाटील, कलीम बेग, संजय नरवाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पवार, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष शेख पापा शेख कालू, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विनोद निकम, हाजी उस्मान बागवान, हाजी मुजफ्फर खान, जी.पी. सोनवणे, रविंद्र साळवे उपस्थित होते.

आर.जी.डी. विद्यालय, कर्की
मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील आर.जी.डी. विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एस. वानखेडे होते. यावेळी पर्यवेक्षक आर.सी. पाटील, एस.एस. वाडिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर भाषणे दिली. सुत्रसंचालन समाधान खर्डे यांनी केले तर आभार एस.के. तायडे यांनी मानले. यावेळी राहुल भोई, सचिन पाटील, निलेश पाटील, वृषाली भोकरीकर, व्ही.व्ही. पाटील, सचिन महाजन, रत्नाकर धायले यांसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ज्ञानोदय वाचनालय, अंतुर्ली
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष तथा वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए. भोई होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन भोई यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे सांगितली. याप्रसंगी अनिल वाडिले, शरद महाजन, दिनेश पाटील, लिलाबाई पवार, भानुदास पाटील, मधुकर वानखेडे, शांताराम महाजन, अनिल न्हावकर व वाचकप्रेमी
उपस्थित होते.