महानायकांची कोरोनावर मात; डिस्चार्ज होऊन घरी परतले

0

मुंबई: बॉलीवूडचे बादशहा , महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यासह अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय-बच्चन, नात आराध्या बच्चनही कोरोनाबाधित होते. दरम्यान आज २ ऑगस्टला अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. अभिषेक बच्चन याने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. अभिषेक बच्चन मात्र अद्यापही रुग्णालयातच आहेत.

11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचे निदान झाले होते. त्यानंतर अभिषेक बच्चनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला होता तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. अमिताभ, ऐश्वर्या व आराध्या या तिघांचीही कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. मात्र अभिषेक बच्चन अद्यापही रूग्णालयात आहे. ‘दुर्दैवाने मी अद्यापही कोरोना पॉझिटीव्ह आहे. मात्र मी सुद्धा कोरोनाला हरवून लवकरच घरी परतेल. पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनांसाठी धन्यवाद,’ असे अभिषेकने स्वत: टिष्ट्वटमध्ये सांगितले आहे.

Copy