Private Advt

महागाईविरोधात राष्ट्रवादी आक्रमक ; रस्त्यावर मांडल्या चुली

वरणगावात पदाधिकार्‍यांनी काढली सायकल रॅली तर रावेर शहरात पदाधिकार्‍यांनी नोंदवला निषेध

वरणगाव : गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खाद्य तेलासह जीवनाश्यक वस्तूंच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने या दरवाढी विरोधात वरणगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी पदाधिकार्‍यांनी रस्त्यावरच चुली पेटवून स्वयंपाक करीत केंद्र सरकारचा निषेध केला. प्रसंगी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली तर रावेरात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वरणगावात पदाधिकार्‍यांनी चुलीवर केला स्वयंपाक
रॅलीचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांनी केले. बसस्थानक चौकामध्ये चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील , युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील उपस्थित होते. वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना निवेदन देण्यात आले

यांचा आंदोलनात सहभाग
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक रवी सोनवणे, माजी नगरसेवक विष्णू खोले, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, महेश सोनवणे, राजेश इंगळे, इफ्तार खा मिर्झा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन
रावेर : पेट्रोल , डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करीत माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विधीमंडळात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या निलंबित 12 आमदारांचा निषेध करण्यात आला. यावेळी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, माजी जि प सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष गोटू महाजन, सावद्याचे राजेश वानखेडे, शेख सलीम, घनशाम पाटील, विलास ताठे , राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, पंकज वाघ, माया बारी, हृदयेश पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.