Private Advt

महसूल पथकाला पाहताच अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालक वाहनासह पसार : ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ असलेल्या वीटभट्टीजवळून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करतांना चालक ट्रॅक्टरसह पसार झाला. ही घटना शुक्रवार, 10 रोजी सकाळी आठ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुका पोलिसात गुन्हा
जळगाव तालुक्यातील आव्हाणे फाट्याजवळ असलेल्या धनराज शेठ यांचे वीटभट्टीजवळ ट्रॅक्टर चालक सचिन उर्फ मुन्ना मराठे (पूर्ण नाव माहित नाही) हा ट्रॅक्टर घेऊन गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करीत असताना मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर (43, रा.आव्हाणे) यांनी शुक्रवारी सकाळी अडवला मात्र ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला. या प्रकरणी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.