मस्कावदसह रसलपूर भागातून दुचाकी लांबवल्या

Bicycles extended from Rasalpur area including Maskavad रावेर : तालुक्यातील मस्कावदसह रसलपूर भागातून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने दुचाकी धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टोळी कार्यरत झाल्याचा संशय
मस्कावद येथील अनिल एकनाथ फालक (70) यांच्या घराच्या कुंपणाजवळून 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.एल.3466) ही 28 ते 29 दरम्यान चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रसलपूर येथील केर्‍हाळा रस्त्यावरील मशीदीजवळून राजाराम मालसिंग भिलाला (30, कुडी, ता.झिरण्या, मध्यप्रदेश) यांच्या मालकिची व 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.पी.10 एमडब्ल्यू 3203) ही 25 रोजी चोरट्यांनी लांबवली. तपास नाईक जगदीश पाटील करीत आहेत.