मसाकात एक लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

0

फैजपूर : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा 2016-17 चा 41 वा गाळप हंगाम 25 रोजी पूर्ण करण्यात आला. यामध्ये 1 लाख 4 हजार 290 मेट्रिक टन ऊस गाळप होवून त्यापासून 89 हजार 250 क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे. 2016-17 या गाळप हंगामात कार्यक्षेत्रातील 2 लाख 50 हजार मेट्रिक टन व कार्यक्षेत्राबाहेरील 50 हजार मेट्रिक टन असे एकूण 3 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऊस तोडणीसाठी प्रतिदिन लागतात पाच हार्वेस्टर
यासाठी ऊस तोडणी व वाहतुकीची यंत्रणा यामध्ये पाच हार्वेस्टर प्रतिदिन 2 हजार 800 ते 2 हजार 900 मेट्रिक टन प्रमाणे नियोजन चालू आहे. 2016-17 मध्ये हा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडत असतांना ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी व वाहतुकदार, व्यापारी, ठेकेदार, अधिकारी, कामगार यांच्याकडून सहकार्य मिळत आहे.

2 हजार 100 प्रमाणे ऊसाचा दर
44 हजार 665 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होवून त्यापासून 33 हजार 775 क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहेे. कार्यक्षेत्रातील 2 लाख 50 हजार मेट्रिक टन व कार्य क्षेत्राबाहेरील 50 हजार मेट्रिक टन असे एकूण 3 लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी ऊस तोडणी व वाहतुकीची यंत्रणा 5 हॉर्वेस्टर प्रतिदिन 2800 ते 2900 मेट्रिक टनाप्रमाणे नियोजन केले आहे. या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठा करणारे उत्पादकांना ऊसाचा दर 2100 रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे अदा करण्याचे नियोजन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

लागवड करण्याचे आवाहन
तसेच पहिला हप्ता संपूर्ण एफआरपीनुसार 1800 रुपये प्रती मेट्रिक टन याप्रमाणे अदा करण्यात येईल व उर्वरित 300 रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे ऊसाचे पेमेंट कारखाना गाळप हंगाम संपल्यानंतर अदा करण्यात येणार आहे. व पुढील हंगामात कारखान्याकडून जाहिर केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेवून मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड करण्याचे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.