मरीज को पैसे भेजने है।

0

मुंबई । गेल्या दोन दिवसांत मुंबईत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या दोघा एजंटना अटक करण्यात आलीय. जावेद आणि अल्ताफ अशी त्यांची नावं आहे. मुंबईत हेरगिरी करण्यासाठी ते कोडवर्डचा वापर कसे करायचे, याचा खुलासा एटीएस चौकशीत झालाय.

– काय झालं संभाषण…
पाक आयएसआय कमांडर – सब खैरियत है ?
जावेद – आपकी दुआ से सब ठीक है
पाक आयएसआय कमांडर – काम कैसे चल रहा है ? कोई दिक्कत ?
जावेद – कोई हुक्म ?
पाक आयएसआय कमांडर – अपना काम आगे बढाना है, मरीज को पैसा भेजना है
जावेद – भेज देता हुँ, पर किस लिये ?
पाक आयएसआय कमांडर – दवा के लिए, समझे?
जावेद – जी हाँ…
पाक आयएसआय कमांडर – तुरंत भेजने है, समझे? दवा के लिए गरीब आदमी को पैसा देना है
जावेद – जी बिलकुल
पाक आयएसआय कमांडर – फौरन भेज दो, खुदा हाफिज
जावेद – खुदा हाफिज

हे संभाषण ऐकून एखाद्या गरीब व्यक्तीला औषधांसाठी पैशांची गरज आहे, असं तुम्हाला वाटेल… पण ही कसलीही मदत नाहीय… तर दहशतवादी कृत्य करण्यासाठी हेराला पैसे पाठवण्यासाठी पाकिस्तानी आयएसआय कमांडरनं सांकेतिक भाषेत पाठवलेला संदेश आहे… या कोडवर्डचा खुलासा झाला तो जावेदच्या अटकेनंतर…
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसनं मुंबईतून जावेद आणि अल्ताफ या दोघा आयएसआय एजंटच्या मुसक्या बांधल्यात. हे दोघेही मूळचे गुजरातमधील राजकोटमधल्या धोराजीचे… पण दक्षिण मुंबईतील एका ख्यातनाम कॉलेजमधून कॉमर्स शाखेचा पदवीधर असलेला जावेद 2009 पासून 2013 पर्यंत मुंबईत आंगडियाच्या नावाखाली हवाला रॅकेट चालवायचा… याच जावेदनं अल्ताफला धोरजीहून मुंबईला आणलं.

तपास यंत्रणांना गुंगारा
दोघे मिळून मुंबईत पाकिस्तान आयएसआय कमांडरच्या आदेशानुसार त्याचे एजंट म्हणून काम करू लागले. जावेदला रोज पाकिस्तानातून फोन येत असत. पण धोराजीमधील आपले अनेक नातेवाईक पाकिस्तानात वास्तव्य करतायत, असं सांगून जावेद तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसला जावेद पाकिस्तानी आयएसआय एजंट असल्याचे ठोस पुरावे सापडले. त्यानुसार जावेद आणि अल्ताफला बेड्या ठोकण्यात आल्या. त्या दोघांकडून प्रत्येकी दोन मोबाईल आणि कोडवर्ड असलेल्या काही डायरी सापडल्यात. दोघांवर ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय. दोघांनाही आठ मे पर्यंतच्या ट्रान्झिट रिमांडवर उत्तर प्रदेश एटीएसच्या हवाली करण्यात आले आहे.