मराठा समाज आरक्षण ; भुसावळात शिवसेनेतर्फे प्राणाची आहुती देणार्‍या बांधवांना आदरांजली

0

भुसावळ- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय भाजपा-युती सरकारने घेतल्यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणार्‍या मराठा समाज बांधवांना गुरुवारी सायंकाळी भुसावळ शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली तसेच मराठा समाज बांधवांच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी शिक्षक सेना जिल्हा प्रमुख विनोद गायकवाड, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, युवासेना तालुका प्रमुख हेमंत बर्‍हाटे, मयूर जाधव, विकास खडके, धिरज मराठे, मनीष पाटील, किरण पाटील, चेतन पाटील, शुभम शिंदे, सुहास गवळी, सचिन चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Copy