मराठा क्रांतीमोर्चा स्थगित

0

मुंबई : मुंबई महापालिकेच्या संभाव्य आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमिवर मुंबईत 31 जानेवारी रोजी होणारा मराठा समाजाचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. मराठा मोर्चाच्या आयोजकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्यावतीने मूक मोर्चे काढण्यात आले होते. नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनावर मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आश्वासनाशिवाय काहीच न मिळाल्यामुळे मुंबईत 31 जानेवारी रोजी मराठा मोर्चा काढण्याचा निर्णय समन्वय समितीच्यावतीने घेण्यात आला होता. रविवारी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईसह इतर जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत होणार्‍या मोर्चाला स्थगिती देण्यात आली. समन्वय समितीची 15 जानेवारी रोजी बैठक होणार असून त्यामध्ये मुंबईतील मोर्चाची तारीख ठरवण्यात येणार आहे.