मराठा आरक्षण विधेयक २९ नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मांडणार – मुख्यमंत्री

0

मुंबई : मराठा आरक्षणाचे विधेयक २९ नोव्हेंबरला दोन्ही सभागृहात मांडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही शिफारसी उपसमितीने स्विकारल्या आहेत. आयोगाच्या अहवालावर एटीआर(अॅक्शन टेकन रिपोर्ट)ही राज्य सरकार सादर करणार आहे.

मराठा आरक्षणाची मागणी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सरकारकडे केली जात आहे. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक मोर्चेही काढले होते. २०१४मध्ये आघाडी सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा विषय मागासवर्गीय आयोगाकडे सोपवला होता. मागासवर्ग आयोगाने तीन महिन्यात, २ लाखांहून अधिक लोकांचा सर्व्हे करून आपला अहवाल राज्य सरकारकडे १५ नोव्हेंबरला सुपूर्द केला. या अहवालात मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला आहे. अहवालात करण्यात आलेल्या तीन शिफारसींनुसार मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा तयार करण्यता आला आहे.

Copy