मराठा आरक्षण: आधीचा आणि आताचा अहवाल सारखाच; हा विजय माझाच-राणे

0

सावंतवाडी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर आता श्रेय घेण्यावरून लढाई सुरू झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले. याबद्दल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.

Copy