मराठा आरक्षणासाठी उपोषण

0

पाचोरा : मराठा समाजाला आरक्षण मान्य करण्यात यावे, या मागणीसाठी पाचोरा तालुका शिवसेनेतर्फे कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागणीचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्याहस्ते तहसीलदार व प्रांतांना देण्यात आले आहे. उपोषणाला माजी नगरसेक किशोर बारवकर, रावसाहेब पाटील, उध्दव मराठे, कृउबा समितीचे सभापती अ‍ॅड.दिनकर देवरे, डॉ. भरत पाटील, भैया राजपूत, संदीपराजे पाटील, पद्मसिंग पाटील, शिवदास पाटील, पं.स. माजी सभापती रवींद्र पाटील, पप्पू राजपूत, डॉ.उत्तम चौधरी, राजेंद्र पाटील, प्रवीण वाघ, मधुकर महाजन, खडू सोनवणे, मनोज पाटील, दीपक पाटील, विजय भोई बसलेले आहेत.