मयत तरुणाचा पोलीस बंदोबस्तात दफनविधी

0

टाकळी प्र.चा.हल्ला प्रकरण; आरोपी जेरबंद
चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र चा येथे गणपती मंडळाच्या स्टेज जवळ डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने गंभीर जखमी होवुन मयत झालेल्या २३ वर्षीय तरुणावर आज दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजता शहरातील दत्तवाडीतील खाटीक समाज स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. दरम्यान चार आरोपी विरोधात शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात कलम ३०२ प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.

२३ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९.३० वाजेच्यस सुमारास तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील खरजई रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयाजवळील शिवराजे गणेश मित्र मंडळाच्या स्टेज जवळ अकील उर्फ बबलु सलीम खाटीक (वय- २३) रा. सावली बिल्डींग खरजई नाका चाळीसगाव यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपी भावडु पाटील, विकी ढवळे, बळीराम महाजन, आण्णा चौधरी सर्व रा चाळीसगाव यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासुन अकील खाटीकवर धुळे येथील ओम क्रिटीकल केअर सेंटर येथे उपचार सुरु होते अखेर उपचारादरम्यान काल दिनांक २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. आज दिनांक २७ रोजी त्याचा मृतदेह चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्याचे नातेवाईक आणणार असल्याचे चाळीसगाव शहर पोलीसांना माहिती मिळताच पोलीस स्टेशनला बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

दुपारी मयताचे नातेवाईक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आल्यावर गुन्ह्यात ३०२ कलम वाढवुन आरोपी अटक केल्याचे नातेवाईकांना सांगीतल्यावर दुपारी अकील खाटीकचा मृतदेह पोलीस स्टेशनला न आणता घरी नेण्यात आला व दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील दत्तवाडी येथील खाटीक समाज स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात त्याचा दफनविधी करण्यात आला. पोलीसांनी चारही आरोपींना अटक केली असुन त्यांच्यावर कलम ३०२ प्रमाणे वाढ करण्यात आली असुन तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील करीत आहेत.

Copy