ममुराबाद नाक्यावरील झोपडीत सुरू सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलिस उपअधीक्षकांचे छापा

0

जळगाव :- तालुक्यातील ममुराबाद नाक्यावरील एका झोपडीत सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शुक्रवारी दुपारी छापा टाकला आहे . या कारवाईत चार संशयितांसह चाळीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

ममुराबाद नाक्यावरील एका झोपडीत सट्टा खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार चिंथा यांनी शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रवींद्र मोतीराया अनिल पाटील, किरण धनके, मनोहर जाधव ,अशोक फुसे व विनयकुमार देसले यांच्या पथकासह छापा टाकला. या कारवाईत सट्टा जुगाराचे साहित्य चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. यापुर्वीही गेल्या काही दिवसांपुर्वी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी शनिपेठ परिसरात कारवाई केली. आता पुन्हा ममुराबाद नाक्यावरील या कारवाईने खळबळ उडाली आहे .

Copy