मन आणि मनाचे आजार विषयावर व्याख्यान

0

शिरपूर । आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 22 फेब्रुवारी रोजी मन आणि मनाचे आजार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव येथील प्रसिद्ध मनोवैज्ञानिक चिकित्सक डॉ.नीरज श्याम देव हे मन आणि मनाचे आजार या विषयावर व्याख्यान देतील. कार्यक्रमाचे आयोजन आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविलयाच्या मानसशास्त्र विभागातर्फे बुधवार दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविलयाच्या ग्रंथालयात घेण्यात येत आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.आर.पाटील तसेच विविध मान्यवरांची यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.