मन्यारखेड्यात बिबट्याच्या हल्यात दोन वासरु ठार

0

वरणगाव । येथून जवळच असलेल्या मन्यारखेडा परिसरातील आधार शांताराम भिल यांच्या गुरांच्या खळ्यात बिबट्याने दोन वासरांवर हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना सोमवार 27 रोजी सकाळी उघडकीस आली.

अचानक हल्ला चढवून पाडला फडशा
भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथील रहिवाशी आधार भिल्ल याने त्याच्या घराजवळच असलेल्या गुरांच्या खळ्यात नेहमीप्रमाणे संध्याकाळी गुरे बांधली होती. मात्र पहाटे सकाळी अचानक बिपट्याने दोन वासरांवर अचानक हल्ला चढवून फडशा पाडला होता. सकाळी आधार भिल्ल यांचा मुलगा निलेश हा सकाळी गाई व म्हशीचे दुध काढण्यास गेला असता वरिल प्रकार दिसून आला तर एक वासरु 8 वर्षांचे दिसत नसल्याने निलेशने आजूबाजूचा परिसर पिंजून काढत असतांना अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या मक्याच्या शेतात मृतावस्थेत आढळला. त्यांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीवरुन माहीती दिली. वरणगाव वनविभागाचे वनपाल वानखेडे व सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून दोघा मृत वासरांचा पंचनामा करुन पुढील तपासासाठी मुक्ताईनगर आरएफओ कार्यालयातील वनक्षेत्र अधिकारी पी.पी. वराडे यांचेकडे पाठविण्यात आले आहे. मन्यारखेडा शिवरात बिबट्या असल्याने येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भागात वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.