मनुदेवी येथे भूगोलाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौरा

0

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे भूगोल विषयाच्या विदयार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारित विविध भौगोलिक घटकांच्या प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीसाठी खास अभ्यासदौऱ्याचे आयोजन मनुदेवी या ठिकाणी करण्यात आले होते. भूगोलाचे खरे ज्ञान हे वर्गात बसून चार भिंतींच्या आत मिळत नाही तर ती केवळ माहिती असते. भूगोलाचे वास्तव ज्ञान प्राप्ती ही क्षेत्रभेटीच्या माध्यमातून होते. म्हणून भूगोल विभागाने अशा अभ्यासदौऱ्याचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केले होते, असे अभ्यासदौऱ्याचे आयोजक भूगोल विभागातील प्रा.डॉ.शैलेश वाघ यांनी सांगितले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सदर क्षेत्रभेटीत खडकांचे प्रकार व रचना, विदारण, नदी, नदीचे कार्य, भुरूपे, धावत्या, धबधबा, पर्यावरण, जैवविविधता, संस्कृती, व्यवसाय यासारख्या घटकांचे प्रत्यक्ष अनुभव घेवून विद्यार्थ्यांना त्या संकल्पना मूर्त रुपात अभ्यासण्याची संधी या अभ्यासदौऱ्याचे माध्यमातून प्राप्त झाली. त्यामुळे विदयार्थ्यांना याचा निश्चितच लाभ झाला. एकूण चौसष्ठ जणांनी या अभ्यासदौऱ्यात सहभाग नोंदवला. अभ्यासदौऱ्यात डॉ. शैलेश वाघ, प्रा.मुकेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यासदौऱ्याच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा.एन.एस. कोल्हे, प्रा.प्राजक्ता बाविस्कर, प्रा.किशोर पाचवणे, प्रा.मोतीराम पावरा, राजू निकम यांनी परिश्रम घेतले.

Copy