मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं विधान

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले, असे भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं. या विधानाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे विधान अडचणीचं ठरू लागल्याने  भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर हे भाषण हटवण्यात आले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभगृहात पार पडली. या बैठकीत अध्यक्षीय भाषणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. या भाषणात त्यांनी सरकार कशा परिस्थितीत स्थापन केले. याविषयी कार्यकर्त्यांना भूमिका सांगितली. सरकार स्थापन करताना आपण विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. अस विधान केलं.  हे विधान प्रसारमाध्यमांकडे आल्यानंतर यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. हे भाषण ट्रोल होऊ लागल्याने हे भाषण भाजप वेबसाईट वरून हटवण्यात आले.  हे विधान करून चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांवर निशाणा साधला असल्याचं बोलल जातंय.