मनसे जिल्हा परिषद निवडणूक लढविणार-जिल्हा बैठकीत निर्णय

0

जळगाव । आगामी काळात होणार्‍या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लढविली जाणार असून मोजक्या जागांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशा निर्णय मनसेच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला. बैठकीत निवडणूकीसंबंधी मनसेच जिल्हा सचिव अ‍ॅड.जमिल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. गेल्या निवडणूकीत दुसर्‍या तिसर्‍या क्रमांकावरील उमेदवारांसाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, रावेर, यावल, अमळनेर, जळगाव तालुका, एरंडोल या ठिकाणी मनसेकडे उमेदवार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला संजय पाटील, विलास राजपूत, राजू सांगोलकर, प्रकाश झोपे, चेतन अढळकर, प्रविण पाटील, सुमीत पाटील, यतीन पटेल, दिलीप सुरवाडे, रज्जाक सैय्यद, संदीप मांडोळे, कल्पेश पवार, किशान नन्नवरे, प्रकार रजवेकर, पंकज माळी, पप्पू बर्गे, विजयानंद कुलकर्णी आदी उपस्थित होत.