Private Advt

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा

औरंगाबाद : पोलिसांनी घालून दिलेल्या अटींसह शर्थींचे उल्लंघण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सभेचे आयोजक राजीव जावळीकर यांच्या विरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अटींचे उल्लंघण केल्याने गुन्हा
1 मे रोजी राज यांची जाहीर सभा औरंगाबाद शहरात झाली. या सभेत राज यांनी धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होईल, असे कुठलेही भाष्य करु नये, असे पोलिसांनी बजावले होते. मात्र, राज यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. तसेच, 3 मे पर्यंत भोंगे हटवावेत. अन्यथा त्याच मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा राज यांनी या सभेत दिला. याद्वारे राज यांनी पोलिसांच्या अटी-शर्थींचे उल्लंघण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राज यांचे संपूर्ण भाषण ऐकून पोलिसांनी अखेर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सिटी चौक पोलिसात गुन्हा
औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला 16 अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात भादंवि कलम 116, 117, 153 अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम 135 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली.