मनवेलला धुनीवाले दादांजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 3 रोजी विविध कार्यक्रम

0

यावल- तालुक्यातील मनवेल येथील हजारो भाविकांचे श्रध्दास्थांन असलेल्या श्री रेवानंद स्वामी यांच्या श्राध्द सोहळ्यांचे आयोजन बुधवार, 3 ऑक्टोबर रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी सात वाजता आरती, आठ वाजता सेवा, 10 वाजता होम, हवन सेवा व दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. दुपारी चार वाजता गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात येईल शिवाय रात्री आठ वाजता महाआरती व 10 वाजेपासून रात्रभर भजन-गायनाचे कार्यक्रम होतील.

रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम
या सोहळ्यानिमित्त साकळी ते मनवेल पर्यंत मोफत प्रवास तसेच साकळी येथील बापू धोबी यांच्याकडून शिरा पोह्यांचे वाटप, मनवेल येथील महर्षी वाल्मीक मित्र मंडळाकडून पोह्यांचे वाटप, विठ्ठल मंदिराजवळ चहा वाटप व रत्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम होतील. भाविकांना वरण-पोळीसह गंगाफळाची भाजी महाप्रसाद म्हणून वाटप केली जाते. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Copy