Private Advt

मनवेलला धाडसी घरफोडी : दिड लाखांचा ऐवज लंपास

यावल : तालुक्यातील मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एक लाख 57 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले. या प्रकरणी शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सकाळी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीमुळे गावात उडाली खळबळ
अरुण कालुसिंग पाटील (रा.मनवेल, ता.यावल) हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार, 27 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व बेडरूममध्ये असलेल्या कपाटात चोरी करीत असतानाच पहाटे चार वाजेच्या सुमारास कपाटाचा आवाज आल्याने अरुण पाटील हे झोपेतून जागे झाले. यावेळी डोक्यात टोपी घातलेल्या दोन चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एक लाख 57 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अरुण पाटील याचा मुलगा तेजभान अरूण पाटील यांनी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार जितेंद्र खैरनार करीत आहे.