Private Advt

मनमाडनजीक भीषण अपघातात चौघै मित्र जागीच ठार

मनमाड : येवल्याहून मनमाडकडे निघालेल्या भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर बालिका गंभीर जखमी झाली. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात हा अपघात घडला. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चार मित्र जागीच ठार झाले. अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले.

मनमाडकडे परतताना अपघात
पाचही मित्र एका कार्यक्रमासाठी येवला येथे गेले होते तर परतीच्या प्रवासता अनकवाडे येथील फौजी ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर मनमाडकडे येताना अपघात हा झाला. या अपघातात कार झाडावर आदळल्याने पाच पैकी चौघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांना वेळ लागला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अपघातात यांचा जागीच मृत्यू
अपघातात अनिल शिवाजी वाघ (42, रा.एरंडगाव, ता.मालेगाव), वाल्मीक वामन बिडगर (52, रा.कानडगाव, ता.चांदवड), विक्रम राजाराम काळे ( काळेवाडी, ता.मालेगाव), बबन जगन सोनवणे (53, रा.रायपूर, ता.चांदवड) या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे गंभीर जखमी झाला आहे.